पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या तब्बल 1025 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab National Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1025 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | क्रेडीट अधिकारी | 1000 |
| 02. | फॉरेक्स – मॅनेजर | 15 |
| 03. | सायबर सिक्योरिटी मॅनेजर | 05 |
| 04. | वरिष्ठ सायबर सिक्योरिटी मॅनेजर | 05 |
| एकुण पदांची संख्या | 1025 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे CA / CMA अथवा CFA / MBA अथवा मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MBA अथवा मॅनेजमेंट मध्ये पीजी डिप्लोमा अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी .ई / बी.टेक ( संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ) अथवा MCA अर्हता तसेच किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी .ई / बी.टेक ( संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ) अथवा MCA अर्हता तसेच किमान 04 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 07 फेब्रुवारी 2024 पासुन https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या संकेतस्थळावर दिनांक 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / इतर मागास प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर SC / ST /PWD प्रवर्गातील उमेदवारांकरीता 59/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .