Railway Corporation : मुंबई रेल्वे विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

Mumbai Railway Vikas Corporation : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .  ( Mumbai Railway Vikas Corporation Recruitment For Project Engineer ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या / पात्रता  : यांमध्ये प्रकल्प अभियंता ( Project Engineer )  पदांच्या एकुण 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये किमान 02 वर्षे अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत ,यांमध्ये SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार 40,000-140,000/- + महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वार्षिक वेतनवाढ , वाहनभत्ता इ. वेतनात आर्थिक लाभ मिळेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Mumbai Railway Vikas Corporation Ltd second Floor , Churchgate Station Building , Churchgate Mumbai 400020 या पत्यावर दिनांक 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये उपस्थित रहायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment