RPF : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये 4,660 जागांसाठी महाभरती  जाहीरात प्रसिद्ध 2024

Spread the love

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये तब्बल 4,660 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भात भारतीय रेल्वे विभागांकडून सविस्तर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .( Railway Protection Force Recruitment For PSI & Constable Post , Number of Post Vacancy – 4,660 ) सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.पोलिस उपनिरीक्षक : पोलिस उपनिरीक्षक पदांच्या 452 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

02.हवालदार ( पोलिस कॉन्स्टेबल ) : पोलिस हवालदार पदांच्या एकुण 4,208 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती , Apply Now !

पदनामपदांची संख्यावेतनमान
पोलिस उपनिरीक्षक45235,400/-
पोलिस हवालदार4,20821,700/-

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्र अर्हता धारक उमेदवारांनी दिनांक .15.04.2024 पासुन ते दिनांक 14.05.2024 पर्यंत खाली नमुद संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 साठी 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 400/- रुपये व  पद क्र.02 साठी 250/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment