RPF : रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4,660 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

रेल्वे सुरक्षा दलांमध्ये तब्बल 4,660 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway Protection Force Recruitment For Sub Inspector & Constable Post , Number of Post Vacancy – 4660 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उपनिरीक्षक ( RPF)452
02.हवालदार ( RPF )4208
 एकुण पदांची संख्या4660

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

💁💁हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांच्या 271 जागेसाठी मेगाभरती 2024 , Apply Now!

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी पदांनुसार किमान / कमाल वय पुढीलप्रमाणे असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

पदनामवयोमर्यादा
उपनिरीक्षक20 ते 28 वर्षे
हवालदार18 ते 28 वर्षे

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbmumbai.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 15 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी /आ.दु.घ प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / अल्पसंख्याक / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment