भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये सुरक्षा जवानांच्या तब्बल 75 हजार 420 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे . या संदर्भात भारतीय रेल्वे बोर्डाकडून रिक्त पदांचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे .रेल्वेची सुरक्षा अधिक सक्षम करण्याकरिता रिक्त व अतिरिक्त पदांची निर्मिती करण्यात येणार आहे , जेणेकरून रेल्वेची सुरक्षा अधिक बळकट करण्यात होण्यास मदत होईल .
पात्रता– सुरक्षा जवान पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यावश्यक आहे .त्याच बरोबर उमेदवाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्ष असणे आवश्यक आहे .मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येते तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येते .
उंची – ओपन व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष उमेदवारकरिता 165 सेंटिमीटर उंची असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांची उंची 160 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे .तर ओपन व इतर मागासवर्गीय महिला उमेदवाराकरिता 157 cm उंची असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय महिला उमेदवारांकरिता 152 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – यामध्ये प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची 100 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येते ,शेवटी लेखी व शारीरिक चाचणीचे गुण मिळवून उमेदवाराची निवड करण्यात येते .
महाराष्ट्र विभागामध्ये 11,204 जागा रिक्त –
देशामध्ये एकूण 75,420 जागा रेल्वे सुरक्षा जवान पदांचे रिक्त असून यापैकी महाराष्ट्र विभागामध्ये एकूण 11,204 जागा रिक्त आहेत.
सदर रिक्त पदावर लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेली आहे , यामुळे देशातील बेरोजगार तरुणांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे .
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !