स्त्री शक्ती योजने अंतर्गत महिलांना विनातारण 25 लाखपर्यंत कर्ज ! जाणुन घ्या सविस्तर योजना !

Spread the love

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारमार्फत अनेक योजना राबविण्यात येतात . यापैकीच स्त्री शक्ती योजना होय , महिलांना आपला स्वत: चा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणुन विनातरण 25 लाख रुपये कर्ज दिले जाते . या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे , अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर योजनाविषयीची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

योजनेचा उद्देश – देशातील महिलांना पुरुषांच्या बरोबर उद्योग सुरु करता यावा , व एक यशस्वी उद्योजक निर्माण करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे . या योजनेच्या अनुषंगाने दि.19.11.2022 रोजी कर्जाची मर्यादा पाच लाख रुपये वरुन 25 लाख रुपये करण्याची घोषणा केंद्र सरकारकडुन करण्यात आली .

योजना कोणामार्फत राबविण्यात येते – ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने ही या योजना यशस्वीपणे राबविण्यात येते . लाभ घेण्यासाठी स्टेट बँकेमार्फत आर्थिक कर्जाची रक्कम उपलब्धक करुन देण्यात येते .

योजनेचे निकष / आवश्यक कागदपत्रे – असा कोणताही उद्योग ज्यामध्ये अर्जदार महिलेचे किमान 50 टक्के भाग / मालकी असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर संबंधित उद्योग / व्यवसायाचे संपुर्ण कागदपत्रे संबंधित अर्जदार महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे .या योजनेसाठी आधारकार्ड / निवडणुक ओळखपत्र , बँक खात्याचा तपशिल , उद्योगासंबधित सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहेत .

व्यापार / उद्योगाच्या भांडवलीनुसार कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते यामध्ये किरकोळ व्यापारी / लघु उद्योगासाठी 50,000/- रुपये ते 2 लाख रुपये कर्ज दिले जाते . त्याचबरोबर व्यवसाय उपक्रमासाठी देखिल 50,000/- ते 2 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते .तसेच व्यवसायिकांसाठी ( व्यवसायाच्या चांगल्या भांडवलदारांसाठी ) 50,000/- रुपये ते 25 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते .

लाभ कसा घ्याल – या योजने अंतर्गत महिलांना कर्ज घ्यायचे असल्यास स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देवून ( शक्यतो आपला व्यवसाय ज्या भागात आहे त्या कार्यक्षेत्रातील SBI शाखा ) योजनाचा लाभ घेवू शकता .

Leave a Comment