राज्य शासनाने केली केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता वाढ ! डी.ए वाढीसह माहे जुलै 2022 पासुनचा महागाई भत्ता फरक  !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ लागु करण्याची मागणी करण्यात आलेली होती , त्या अनुषगांने राज्य शासनाने माहे जुलै 2022 पासुन महागाई भत्ता फरकासह डी.ए मध्ये वाढ करणेबाबत मंजुरी दिली आहे . यासंदर्भात राज्याच्या विधी व न्याय विभागाचा अधिकृत्त शासन निर्णय दि.21.11.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

महागाई भत्ता मध्ये 9% वाढ –

केंद्र सरकारने 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए मध्ये 9 % वाढ करण्यात आलेली आहे . त्याचधर्तीवर राज्यातील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे .केंद्र सरकारच्या ज्ञापनानुसार राज्यातील ( विधी व न्याय विभाग ) दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 च्या अगोदर निवृत्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जुलै 2022 पासुन  9 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येत आहे . यामुळे या सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 212% झाला आहे .

सदर डी.ए फरक हा माहे जुलै 2022 पासुन अनुज्ञेय करण्यात आला आहे . यामुळे न्यायिक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .या संदर्भातील विधी व न्याय विभागाचा सविस्तर शासन निर्णय ( संकेतांक क्रमांक  202211211725221512 ) पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment