राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ताबाबत , आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेतील शासकीय ,जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना एकुण 7 टक्के महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे . सात टक्के डी.ए वाढी संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए वाढ –
राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे . सदरचा वाढीव चार टक्के महागाई भत्ता केंद्र सरकारने लागु केला असून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै पासून 4 टक्के डी.ए वाढ लागु होणार आहे . या संदर्भात वित्त विभागाकडुन प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून याबाबत राज्य सरकारकडुन लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे .
माहे जानेवारी 2023 पासून 3 टक्के डी.ए वाढ –
केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले असून , सदर वाढीव निर्देशांकांच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासुन 3 टक्के वाढीव महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे . याच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए लाभ मिळेल .
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 ची डी.ए वाढ बाकी आहे , तसेच जानेवारी 2023 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये एकुण 7 टक्के वाढ होणार आहे .
सरकारी कर्मचारी विषयक , शासकीय योजना / पदभरती तसेच मराठी ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !