राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शनसह मिळणार , आणखीण 3% डी.ए वाढीचा लाभ !

Spread the love

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद तसेच इतर पुर्णकालिक कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसह , आणखीण तीन टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील आत्ताची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

जुनी पेन्शनमुळे राज्याच्या तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार –

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन जुनी पेन्शन ( Old Pension ) सर्व लाभासह लागु केल्यास , राज्याच्या तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार येणार आहे .जुनी पेन्शन प्रमाणे वर्ग -क मधील कर्मचाऱ्यांना 30,000/- रुपये पर्यंत पेन्शन मिळेल व त्यात वाढ होत राहील . परंतु नविन पेन्शन प्रमाणे ( NPS ) 5,000/- देखिल पेन्शन मिळणे शक्य होत नाहीये . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रणाली लागु झाल्यास मोठा उतारवयामध्ये मोठा आधार मिळणार आहे .

आणखीण वाढीव 3 टक्के डी.ए चा देखिल मिळणार लाभ –

केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए 3 टक्के वाढ जाहीर केलेली आहे . याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखिल माहे जानेवारी महीन्यापासून वाढीव तीन टक्के डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .या संदर्भातील शासन निर्णय राज्य शासनाकडुन लवकरच निर्गमित होण्याची शक्यता आहे .

सरकारी कर्मचारी , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment