सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत अनुदान वितरित करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडुन दि.01.11.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी 490 लाख रुपये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी 315 लाख रुपये असे एकुण 805,00,000/-इतके अनुदान वितरित करण्यास सदर शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे .सदरचे अनुदान चालु आर्थिक वर्षातील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरीता उपयोगात यावे असे निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे . तसेच योजनानिहाय व बाबनिहाय वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित राहत असल्यास इतर बाबींसाठी परस्पर वर्ग करु नये किंवा खर्च करु नये असे आदेश देण्यात आले आहेत .
यामुळे राज्यतील रही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत निर्वाह भत्ता / विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे . या संदर्भातील दि.01.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
Yas