NABARD : ग्रामीण विकास बँकेत गट क संवर्गातील 108 जागेसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

NABARD : ग्रामीण विकास बँकेत गट क संवर्गातील 108 जागेसाठी मोठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nabard Recruitment for office attendant post , number of Post vacancy – 108 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ऑफीस अटेंडंट ( ग्रुप सी ) पदांच्या एकुण 108 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for office attendant post , number of Post vacancy – 108 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.10.2024 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/  या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी करीता 450/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment