राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ लागु करण्याची मागणी करण्यात आलेली होती , त्या अनुषगांने राज्य शासनाने माहे जुलै 2022 पासुन महागाई भत्ता फरकासह डी.ए मध्ये वाढ करणेबाबत मंजुरी दिली आहे . यासंदर्भात राज्याच्या विधी व न्याय विभागाचा अधिकृत्त शासन निर्णय दि.21.11.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
महागाई भत्ता मध्ये 9% वाढ –
केंद्र सरकारने 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए मध्ये 9 % वाढ करण्यात आलेली आहे . त्याचधर्तीवर राज्यातील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे .केंद्र सरकारच्या ज्ञापनानुसार राज्यातील ( विधी व न्याय विभाग ) दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 च्या अगोदर निवृत्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जुलै 2022 पासुन 9 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येत आहे . यामुळे या सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 212% झाला आहे .
सदर डी.ए फरक हा माहे जुलै 2022 पासुन अनुज्ञेय करण्यात आला आहे . यामुळे न्यायिक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .या संदर्भातील विधी व न्याय विभागाचा सविस्तर शासन निर्णय ( संकेतांक क्रमांक 202211211725221512 ) पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..