देशातील सुशिक्षित बेराजगार तरुणांना नोकरीची सर्वात मोठी संधी आली आहे . केंद्रीय महसुल विभागांमध्ये बहुउद्देशिय कर्मचारी ( Multi Tasking Staff ) व हवालदार पदांच्या तब्बल 11,409 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक व शारिरीक अर्हता धारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ,सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – बहुउद्देशिय कर्मचारी ( MTS ) / हवालदार ( एकुण पदांची संख्या 10880+529 = 11,409 )
पात्रता – वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हा इयत्ता इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सरकारने विहीत केलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक आहे .हवालदार ( Havaldar ) पदांकरीता उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – वरील बहुउद्देशिय कर्मचारी पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . तर हवालदार पदांकरीता उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .मागास प्रवर्ग ( SC / ST ) करीता वयांमध्ये 5 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग ( OBC ) करीता वयांमध्ये 5 वर्षांची सुट देण्यात येते .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दि.17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर भरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडुन 100/- रुपये आवेदन शुल्क म्हणून स्विकारले जातील तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक /महिला उमेदवारांकरीता शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !