राज्य शासनाच्या महसूल विभागामध्ये तलाठ्यांच्या रिक्त पदावर 4,122 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झालेली आहे .या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरती प्रक्रियेला अधिक वेग देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आलेले आहेत .
तलाठी पदाच्या रिक्त पदावर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पद भरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे . यामध्ये रिक्त पदांचे एकूण 3,110 तर नव्याने निर्गमय झालेल्या 1,102 अशी एकूण मिळून 4,122 जागेवर मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
तलाठी पदांच्या नावांमध्ये बदल करण्यात येणार असून ,तलाठी पदा ऐवजी ग्राम प्रशासन अधिकारी असा बदल करण्यात येणार आहे . यानुसार तलाठ्यांना ग्राम पातळीवरील प्रशासन प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे . यामुळे ग्रामीण पातळीवरील समस्या ग्रामीण स्तरावरच सोडवल्या जाणार आहेत .
यामुळे तलाठी पदांची पद भरती अधिक पारदर्शक करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस, टीसीएस कंपनी मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . शासनाच्या महसूल व वन विभागाकडून तलाठी पदांच्या जिल्हा नुसार रिक्त पदांचा अहवाल राज्य शासनाला बिंदू – नियमावलीनुसार सादर करण्यात आलेला आहे .
जिल्हानिहाय रिक्त पदांची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा !
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026