महाराष्ट्र शासन सेवेतील रिक्त पदांवर विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . पदनिहाय रिक्त पदांची संख्या व सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील संवर्ग क मधील नामनिर्देशनाची रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात बाबत जलसंपदा विभागाकडून दि.03.04.2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकान्वये जलसंपदा विभागांमध्ये सरळसेवा पद्धतीने भरावयाचा रिक्त पदांचा तपशिल नमुद करण्यात आलेला आहे . यामध्ये गट ब संवर्गातील अराजपत्रित पदांची एकुण 1076 पदे रिक्त् आहेत . यामध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य /यांत्रिकी / विद्युत व यांत्रिकी ) , वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांचा समावेश आहे .
तर गट क संवर्गामध्ये निन्मश्रेणी लघूलेखक , भू वैज्ञानिक सहाय्यक , कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक , आरेखक , सहाय्यक आरेखक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , अनुरेखक , प्रयोगशाळा सहाय्यक , सहाय्यक ग्रंथपाल , सहाय्यक भांडारपाल , कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक , दप्तर कारकुन , मोजणीदार , कालवा निरीक्षक अशा पदांच्या तब्बल 4,494 रिक्त पदांचा समावेश आहे .सरळसेवा पद्धतीने पदभरती करावयाचे गट ब ( अराजपत्रित पदे ) व गट क संवर्गातील एकुण 5,570 पदांसाठी पदभरती राबविण्याबाबत तपशिल जाहीर करण्यात आलेला आहे .
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !