महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 18 हजार 939 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यामध्ये गट क संवर्गातील वाहनचालक हे पद वगळून पदभरती प्रकिया करण्यात येणार आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत महाराष्ट्र राज्य शासनांच्या ग्रामविका विभागांकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
सदर ग्राविकास विभागाच्या पदभरती शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालब्द कार्यक्रम अनुक्रमे 21 ऑक्टोंबर 2022 व दि.15 नोव्हेंबर 2022 च्या शसन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे . सदर जाहीरातीद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकुण 18 हजार 939 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे .
सदर शासन परित्रकानुसार विभागाच्या दि.16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार दि.31.12.2023 पर्यंत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहीरातींकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : तलाठी महाभर्ती 2023 चे सुधारीत वेळापत्रक व नियम जाहीर !
सदर पदभरती परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामवली अंतिम करण्याचे काम पुर्ण झालेले आहेत , सामान्य प्रशासन विभागाच्या दि.21.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा ही TCS / IBPS या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत .
पदांनुसार आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी व याबाबत ग्रामविकास विभागांकडून दि.12.04.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले नविन पदभरती शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !