महाराष्ट्र राज्य शासनांच्या दारुबंदी विभागांमध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पदभरती प्रक्रिया बाबत परिपत्रक दि.28 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्य उत्पादन शुल्काच्या दारुबंदी विभागाकरीता जवान व जवान नि- वाहनचालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदरची पदभरती प्रक्रिया ही सरळसेवा पदभरती नियमानुसार करण्यात येणार असून ,याकरिता सेवा प्रवेश नियम 1993 लागू असणार आहेत .
यांमध्ये जवान व जवान नि- वाहनचालक या पदांकरीता प्रथम 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल , तर त्यानंतर 80 गुणांची शारिरीक चाचणी / मैदानी परीक्षा घेण्यात येईल . लेखी परीक्षेकरीता बुद्धमत्ता चाचणी , सामन्य ज्ञान , मराठी , इंग्रजी असे चार विषय असणार आहेत .तर शारिरीक चाचणी करीता पुरुष उमेदवारांसाठी 1.5 कि.मी धावण्यासाठी 30 गुण , 100 मीटर धावणे 30 गुण तर गोळा फेक करीता 20 गुण असे 80 गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे .
तर महिला उमेदवारांकरीता 1 कि.मी धावणे 30 गुण , 100 मीटर धावणे 30 गुण व गोळा फेक 20 गुण असे 80 गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे .उमेदवाराची अंतिम निवड करताना लेखी परीक्षेचे 120 गुण व शारिरिक चाचणीचे 80 गुणांची एकत्रित बेरीज करुन उमेदवारांची गुणाक्रमे अंतिम निवड करण्यात येईल .
तर चपराशी या पदांकरीता 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून , यामध्ये बुद्धीमत्ता चाचणी 50 गुण , सामान्य चाचणी 50 गुण , मराठी 50 गुण व इंग्रजी 50 गुण असे एकुण 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील पदभरती जाहिरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .