महाराष्ट्र शासन दारुबंदी विभागांमध्ये फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी मोठी मेगाभरती ! असा करा अर्ज !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनांच्या दारुबंदी विभागांमध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पदभरती प्रक्रिया बाबत परिपत्रक दि.28 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्य उत्पादन शुल्काच्या दारुबंदी विभागाकरीता जवान व जवान नि- वाहनचालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदरची पदभरती प्रक्रिया ही सरळसेवा पदभरती नियमानुसार करण्यात येणार असून ,याकरिता सेवा प्रवेश नियम 1993 लागू असणार आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

यांमध्ये जवान व जवान नि- वाहनचालक या पदांकरीता प्रथम 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल , तर त्यानंतर 80 गुणांची शारिरीक चाचणी / मैदानी परीक्षा घेण्यात येईल . लेखी परीक्षेकरीता बुद्धमत्ता चाचणी , सामन्य ज्ञान , मराठी , इंग्रजी असे चार विषय असणार आहेत .तर शारिरीक चाचणी करीता पुरुष उमेदवारांसाठी 1.5 कि.मी धावण्यासाठी 30 गुण , 100 मीटर धावणे 30 गुण तर गोळा फेक करीता 20 गुण असे 80 गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे .

तर महिला उमेदवारांकरीता 1  कि.मी धावणे 30 गुण , 100 मीटर धावणे 30 गुण व गोळा फेक 20 गुण असे 80 गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे .उमेदवाराची अंतिम निवड करताना लेखी परीक्षेचे 120 गुण  व शारिरिक चाचणीचे 80 गुणांची एकत्रित बेरीज करुन उमेदवारांची गुणाक्रमे अंतिम निवड करण्यात येईल .

तर चपराशी या पदांकरीता 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून , यामध्ये बुद्धीमत्ता चाचणी 50 गुण , सामान्य चाचणी 50 गुण , मराठी 50 गुण व इंग्रजी 50 गुण असे एकुण 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील पदभरती जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment