PNB : पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab National Bank Recruitment For Officers , Manager And Senior Manager Post , Number of Post Vacacny -240 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ऑफिसर ( अधिकारी ) | 224 |
| 02. | मॅनेजर ( व्यवस्थापक ) | 11 |
| 03. | सिनियर मॅनेजर ( वरिष्ठ व्यवस्थापक ) | 05 |
| एकुण पदांची संख्या | 240 |
पात्रता – यांमध्ये ऑफिसर ( अधिकारी ) पदांसाठी उमेदवार हा CA /CMA /ICWA /MBA /PGDM / 60 टक्के गुणांसह इंजिनिअरींग पदवी समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर मॅनेजर ( व्यवस्थापक ) पदांसाठी उमेदवार हा अर्थशास्त्र पदवी / B.E/B.TECH /M.E/M.TECH समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर सिनिअर मॅनेजर ( वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी उमेदवार हा B.E/B.TECH /M.E/M.TECH /कॉम्प्युटर सायन्स किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : पशुसंवर्धन विभागामध्ये मेगाभर्ती 2023 !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/pnbmay23/ या संकेतस्थळावर दि.11 जून 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी उमेदवारांकरीता 850/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026