महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तब्बल 75 हजार पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासंदर्भात राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून नवीन सुधारित पदभरती शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर पद भरती प्रक्रिया शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पद भरतीच्या कालाबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दिनांक 21 ऑक्टोबर 2022 व दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , जाहीर करण्यात आला होता . सदर जाहिरातीनुसार सर्व जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गातील तब्बल 18 हजार 939 पदे भरण्यात येणार आहेत .
सदर पद भरती प्रक्रिया मध्ये दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरती जाहिरातीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शितलता देण्यात येणार आहे . या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक 16 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : खाजगी / अनुदानित शाळा मध्ये तसेच सहकारी संस्था मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया !
सदर पद भरती प्रक्रिया शासन परिपत्रकामध्ये पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर परीक्षेचे वेळापत्रक पदांची नावे , वेतनश्रेणी नमूद करण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहेत .
सदर पद भरती प्रक्रिया संदर्भातील राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सुधारित पदभरती प्रक्रिया शासन परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे .
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !
- केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 39,481 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकुण 58 जागेकरीता पदभरती , लगेच करा आवेदन ..
- भारतीय नौदलांमध्ये तब्बल 250 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..