महाराष्ट्र राज्य शासनांच्या महसून व वन विभाग अंतर्गत तब्बल 4,644 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ministry of Revenue and Forest Department Recruitment for Talathi Post ,Number of Post Vacancy – 4,644 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये तलाठी पदांच्या एकुण 4,644 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राज्याच्या महसूल व वन विभागांकडून राबविण्यात येत आहे . राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेल्या प्रारुप जाहीरातीमध्ये काही बदल करुन नव्याने पदभरती जाहीरात महसूल व वन विभागांकडून निर्गमित करण्यात आलेली आहे .
पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच MSCIT / CCC संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवारांस मराठी भाषेचे संपुर्ण ज्ञान असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवार दहावी मध्ये मराठी / हिंदी विषयास उत्तीर्ण न झाला असेल तर त्यास एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे .
वेतनमान : – तलाठी या पदांस सातव्या वेतन आयोगामध्ये 25,500-81,100/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन + महागाई भत्ते व इतर देय वाहन भत्ते , पुरक भत्ते अनुज्ञेय असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर दिनांक 17.07.2023 पर्यंत सादर करु शकता .
अधिक माहितीकरीता खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !