BECIL इंडिया लिमिटेड मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई ( MTS ) पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BECIL Recruitment For Data Entry Operators & MTS Post , Number of Post Vacancy – 18 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.डाटा एन्ट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) : सदर पदांच्या एकुण 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेरदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवारास संगणक , MS Exel तसेच टायपिंग इंग्रजी 35 प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , सदर पदांस प्रतिमहा 23,082/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .
02.शिपाई ( MTS ) : सदर पदांच्या 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्क असणार आहेत , तसेच उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिमहा 17,494/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.becil.com/ या संकेतस्थळावर दिनांक 07.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 885/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / माजी सैनिक प्रवर्ग करीता 531/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026