BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या 4,320 जागेसाठी मेगाभर्ती 2023 !

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी पदांच्या तब्बल 4,320 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . नुकतेच महापालिकेचे सन 2023-24 करीताचे अर्थसंकल्प जाहीर करण्यात आले असून , या संकल्पामध्ये पालिकेत रिक्त पदांच्या 10 हजार जागेवर पदभरती करण्यात येणार असून यापैकी सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या 4,320 जागेसाठी पदभरती करण्यात येईल .

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या रिक्त पदांपैकी पालिका प्रशासनांमध्ये 15 हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . या रिक्त पदांवर लवकरात लवकर पदभरती करण्याच्या सुचना राज्य शासनांकडून देण्यात आलेल्या आहेत . या 15 हजार रिक्त जागांपैकी पालिका प्रशासनांकडून 10 हजार जागेवर पदभरती करण्याचे निश्चित करण्यात  करण्यात आले असून , यापैकी पालिकेने अग्निशमन जवान पदांच्या 950 जागेसाठी पदभरती सुरु केली आहे .

पालिका प्रशासनांमध्ये सफाई कर्मचारी पदांचा मोठा वाटा आहे , कारण मुंबई शहराच्या सौंदर्यांमध्ये वाढविण्याचे काम सफाई कर्मचारी करत असतात .त्याचबरोबर साथीच्या आजांरामध्ये अनेक उपाययोजना सफाई कर्मचारी करत असतात .याकरीता सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर लवकरच पदभरती करण्यात येणार आहेत .

सफाई कर्मचारी पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आावश्यक आहे , तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे .तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .

सफाई कमचारी पदांबरोबरच चौकीदार , शिपाई , सुरक्षा रक्षक , मजुर अशा चतुर्थश्रेणी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

Leave a Comment