महाराष्ट्र राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ होणार आहे . माहे जानेवारी 2023 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये चक्क 42 टक्के पर्यंत वाढ होणार आहे .याबाबतची आत्ताच्या घडीची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .
नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन निर्गमित झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4.24 टक्के वाढ बसते . सध्या राज्य व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे . यामध्ये आता 4 टक्क्यांची वाढ होणार आहे . यामुळे माहे जानेवारी 2023 पासून केंद्रीय तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना चक्क 42 टक्के पर्यंत महागाई भत्ता वाढ मिळणार आहे .
सदरचा वाढीव महागाई भत्ता हा माहे जानेवारी 2023 पासुन लागु होणार असून हा वाढीव महागाई भत्ता माहे मार्च महिन्यांपासून प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येईल . यामध्ये जानेवारी पासूनची डी.ए थकबाकीची रक्कम देखिल वेतनापासून रोखीने अदा करण्यात येईल .
सदर चार टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ केंद्रीय व राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनाही मिळणार आहे .केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन माहे डिसेंबर 2022 पर्यंतचे AICPI निर्देशांक जाहीर झाल्याने सदर डी.ए वाढ निश्चित करण्यात आलेली आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !