बृहन्मुंबई पालिकेमध्ये तब्बल 5,575 पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती तपशिल , आवश्यक पात्रता , वेतनमान इत्यादी बाबत सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
मुंबई पालिकेमध्ये आशा सेवका पदांच्या तब्बल 5 हजार 575 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पालिकेतील आरोग्य केंद्रामध्ये 1 हजार ते 1200 लोकसंख्येसाठी एक आशा सेविका अशा पद्धतीने त्याचबरोबर इतर 250 घरांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे .
आवश्यक पात्रता – यामध्ये आशा सेविका हे पद महिला उमेदवारांमधूनच भरण्यात येणार असून , महीला उमेदवार ही इयत्ता 10 वी ( SSC ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर उमेदवारांमध्ये आशा सेविका म्हणून काम करण्याचे संघटन व संवाद तसेच नेतृत्व करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे .
वेतनमान – आशा सेविका हे पद राज्य शासनाने अतिरिक्त कर्मचारी / अर्धवेळ कर्मचारी असल्याने , सदर कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे , नियमित वेतनश्रेणीवर वेतन अदा करण्यात येत नाहीत तर 6,000/- प्रतिमहा मानधन देण्यात येते .
अर्ज प्रक्रिया – आशा सेविका पदांकरीता आवश्यक पात्रता असणाऱ्या उमदेवारांनी आपला अर्ज दि.13 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे . या पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !
- विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- नाशिक येथे शिक्षण संस्थेवर पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती !