गुप्तचर विभाग मध्ये 226 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 226 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Intelligence Recruitment For Officer Grade- II , Number of post Vacancy – 226 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.संगणक विज्ञान आणि आयटी79
02.इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन147
 एकुण पदांची संख्या226

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे बी.ई / बी.टेक ( यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / आयटी संगणक इंजिनिअरिंग ) अथवा भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / संगणक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी , GATE 2021/2023 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लातुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 80 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/ या संकेतस्थळावर दिनांक 12 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment