Clerk : पदवीधारकांना लिपिक / कारकुन पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पदवीधारक उमेदवारांसाठी लिपिक / कारकुन या पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ajantha Urban Co-operative Bank Recruitment For Clerk Post ) पदनाम , पदांची संख्या , पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अजिंठा सहाकारी बँक ही औरंगाबाद शहरातील 800 कोटीच्या वर व्यवसाय असणाऱ्या नामांकित बँकेला कारकून / लिपिक पदांसाठी पदभरती करावयाची असल्याने पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर लिपिक / कारकुन या पदाकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीधारक यांमध्ये डी.सी.एम / GDC & A असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे . तसेच संगणक ज्ञान असणे अत्यावश्यक असणार आहे , यांमध्ये MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन , मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , Apply Now !

वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे पेक्ष अधिक असू नये .

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या अर्हताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे अजिंठा सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद मुख्य कार्यालय – झांबड हाईट्स पहिला मजला जाधवमंडी , औरंगाबाद या पत्त्यावर दिनांक 28 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment