CSL : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , Apply Now !

Spread the love

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रिया करीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cochin Shipyard Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 54 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / शैक्षणिक अर्हता : यांमध्ये प्रकल्प सहाय्यक ( Project Assistants )  या पदांच्या तब्बल 54 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित डिप्लोमा किंवा एम कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी कमाल वय हे 30 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा :केंद्र सरकारच्या  अधिनस्त तब्बल 2500 जागांसाठी महाभरती , आवेदन सादर करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 600 रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment