दुधाळ संकरित गाई म्हशींचे वाटप योजना ! या योजनेच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदीवर शासन देत आहे अनुदान; चला बघूया अर्ज कसा करावा !

Spread the love

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो आज आपण आजच्या लेखामध्ये शासनामार्फत राबवली जाणारी दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप योजना या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना कशा प्रकारे चालते? कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभाग घेऊ शकतात? या योजनेची प्रकल्प किंमत शासन निर्णय लाभार्थी निवडीचे निकष अर्ज कोठे करावा? व महत्त्वाची कागदपत्रे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल!

मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट, यासोबतच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार असून ही योजना राज्यांमधील पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून देशी व संकरित गाई यांचे वाटप करण्यात येत आहे.

६/४/२ दुधाळ गाई /म्हशी चे वाटप खालील जाती प्रमाणे असणार आहे!

१) संकरित गाय – एच.एफ. / जर्सी

२) म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी

३) देशी गाय – गीर, साहिवाल, थारपारकर देवनी, लाल कंधारी, रेड सिंधी, राठी, गवळाऊ व डांगी

या ठिकाणी ही योजना राबवली जाणार नाही!

शेतकरी बंधू भगिनींनो शासनाने राबवलेली ही योजना आर्थिक वर्षांमध्ये मुंबई यासोबतच मुंबई उपनगरी आणि दूध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले जिल्हे म्हणजेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये शासन ही योजना राबवत नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू नये.

गटाप्रमाणे प्रकल्पची किंमत खालीलप्रमाणे!

1) संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे ८०,००० रुपये

2) ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा ५,०६१ रुपये

3) एकूण मिळून एका प्रकल्पाची किंमत ही ८५,०६१ असणार आहे

अर्ज करत असताना सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे!

१) फोटो
२) ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
३) सातबारा (अनिवार्य)
४) ८ अ उतारा (अनिवार्य)
५) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
६) आधारकार्ड (अनिवार्य )
७) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसेल तर अशावेळी कुटुंबाचे संमती पत्र,
८) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
९) रहिवासी प्रमाणपत्र
१०) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
११) बँक खाते पासबुक सत्यपत्र
१२) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
१४) जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा!

  • सर्वात आधी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावरती नोंद करून घ्या,
  • यानंतर दुधाळ गाई म्हशी वाटप ह्या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करा,
  • आपण अर्ज केल्यानंतर शासनामार्फत या योजनेसाठी प्राथमिक निवड केली जाईल,
  • अर्ज करताना निवडलेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे,
  • अर्ज तपासून शासनामार्फत सर्वात शेवटी अंतिम निवड केली जाईल,

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कुठे करावा?

शेतकरी बंधू भगिनींनो दुधाळ गाई म्हशी अनुदान ह्या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तो अर्ज तुम्ही शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. या लेखाच्या सर्वात शेवटी शासनाची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती क्लिक करून अर्ज करावा.

शासन निर्णय प्रमाणे दुधाळ गाई किंवा मशीचे वाटप योजना राज्यांमधील दूध उत्पादनास चालला देण्यासाठी गाई म्हशीचे वाटप करणे गरजेचे असून शासन ही योजना अनुसूचित जाती आदिवासी समाज सर्वसाधारण प्रवर्ग राज्यस्तरीय शेतकरी अशा विविध लोकांसाठी राबवण्यात आले आहे.

तरी पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन दूध व्यवसाय अगदी चांगल्या प्रकारे करावा. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा लागतो. शासनाच्या खाली दिलेले लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

Leave a Comment