भारतीय बँकिंग सेवा मध्ये विविध स्केल अ संवर्गातील तब्बल 4451 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking Personnel Selection Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 4451 ) पदनाम पदांची संख्या आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी ( स्केल – 1 ) पदांच्या एकुण 3049 जागा , ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी पदांच्या 500 जागा , राजभाषा अधिकारी पदांच्या 41 जागा , विधी अधिकारी ( स्केल – 1 ) पदांच्या 10 जागा , पर्सोनेल अधिकारी पदांच्या 31 जागा तर मोर्केटिंग अधिकारी ( स्केल – 1 ) पदांच्या 700 जागा अशा एकुण 4451 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाकरीता उमदेवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर इतर उर्वरित पदांकरीता उमेदवार हे संबंधित पदांनुसार व्यवसायिक अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ , पारेषण मध्ये 137 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी प्रोबेशनरी या पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/ या संकेतस्थळावर तर उर्वरित पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करा .
हे पण वाचा : वखार महामंडळ मध्ये विविध पदांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
01. प्रोबेशनरी अधिकारी पदाकरीता जाहिरात पाहा
02. उर्वरित पदांकरिता जाहिरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !