आपण जर इयत्ता 12 वी उत्तीर्ण असाल तर , तब्बल 7 हजार 547 जागांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . तर अशा 12 वी पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे विहीत काळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Delhi Police Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 7,547 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – पुरुष ) पदांच्या 4,453 जागा , कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – पुरुष माजी सैनिक ) पदांच्या 266 जागा , कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – पुरुष ) पदांच्या 337 जागा , तर कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – महिला ) पदांच्या 2,491 जागा अशा एकुण 7,547 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत , तसेच उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे वयामध्ये सुट तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद अर्हता असणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या वेबसाईट वर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 30.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर भरती करीता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026