महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 246 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.आयटीआय अप्रेंटिस : आयटीआय अप्रेंटिस पदांमध्ये फिटर , मशिनिस्ट , स्टेनोग्राफर , ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स आणि स्टेनोग्राफर , वायरमन , वेल्डर , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक , पंप ऑपरेटर , इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक , कोपा , मेसन , मशिनिस्ट ग्राइंडर MMTM  पदांच्या 210 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

02.पदवीधर अप्रेंटिस : पदवीधर अप्रेंटिस पदांमध्ये इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल , सिव्हिल , इलेक्ट्रॉनिक पदवीधर पदांच्या 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

03.डिप्लोमा अप्रेंटिस : डिप्लोमा अप्रेंटिस पदांमध्ये  इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल डिप्लोमा धारकांच्या 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत  .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment