महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातील विविध पदांच्या 10,027 जागांसाठी मेगाभरती जाहीर !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाशी सबंधित आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता , आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील पदभरतीचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम / परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . यामध्ये एकुण 10,027 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . आरोग्य विभागाची सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता , आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गाती पदे . एकुण पदांची संख्या – 10,027

आरोग्य विभाग हे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असून , कोविड कालावधीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी उणिव भासली होती . याकरीता राज्य शासनाकडुन कंत्राटी पद्धतीने पदे भरली होती .सदर कोरोना कालावधीमध्ये कंत्राटी / मानधन तत्वावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सदर आरोग्य पदभरती मध्ये विशेष सवलती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे .

वरील आरोग्य विभागातील नमुद पाच संवर्गातील पदभरतीचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम / परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला असून , याकरीता पदभरतीची जाहीरात 01 ते 07 जानेवारी दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक . 22 जानेवारी 2023 असणार आहे .त्याचबरोबर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने परीक्षा ही 25 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे .

दि. 27 मार्च ते 27 या कालावधीमध्ये पदभरतीचा अंतिम निकाल जाहीर करुन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचे संभाव्य वेळापत्रकानुसार नियोजित आहे . या संदर्भातील आरोग्य विभागाचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे .

Leave a Comment