महाराष्ट्र राज्य भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे , या सुधारित आकृतीबंधानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतीमध्ये गट अ ते गट ड पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
यांमध्ये भुजल सेर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील पदांचा सुधारित आकृतीबंध या शासन निर्णयान्वये अंतिम करण्यात येत असल्याने या आकृतीबंधातील 1183 नियमित पदांपैकी गट क संवर्गाची पदे भरण्यासंदर्भात वित्त विभागाच्या संदर्भाधिन दिनांक 31.10.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीची कार्यवाही संचालना मार्फत करण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : केंद्रीय गृह मंत्रालय मध्ये तब्बल 1,29,929 पदांसाठी मेगाभर्ती !
यांमध्ये लेखाधिकारी , कनिष्ठ रसायनी , प्रोग्रामर , भौगिलिक माहिती ,प्रयोगशाळा सहाय्यक , वरिष्ठ लिपिक , कार्यालय अधिक्षक , कनिष्ठ लिपिक , उपलेखापाल , रिंगमन , लघुटंकलेखक , वाहनचालक , बहुउद्देशिय कर्मचारी इ. पदांच्या 1183 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे .
सदर शासन निर्णयानुसार विविध पदांच्या गटनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . यांमध्ये गट अ संवर्गाती एकुण 162 पदे गट ब संवर्गातील एकुण 368 पदे व गट क संवर्गाती एकुण 653 पदे भरण्यास सदर सुधारित आकृतीबंधानुसार मान्यता देण्यात येत आहे .
तर संवर्ग ड मधील पदे मृत घोषित करुन सदर वर्ग – 4 मधील वाहनचालक पदांच्या 122 जागा तर बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या एकुण 178 पदांकरीता बाह्यस्त्रोताद्वारे पदभरती करण्यात मान्यता देण्यात आलेली आहेत .
सुधारित आकृतीबंधानुसार गट व जिल्हानिहाय पदांची संख्या / सविस्तर जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !