महाराष्ट्र भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील गट अ ते ड संवर्गातील तब्बल 1183 पदांसाठी पदभरती बाबत सुधारित पदभरती जाहीरात निर्गमित !

Spread the love

महाराष्ट्र भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील गट अ ते  गट ड संवर्गातील तब्बल 1183 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनांच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून दि.24.04.2023 रोजी महत्वपुर्ण सुधारित पदभरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या दि.13.12.2022 रोजीच्या मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीच्या बैठकीतील मान्यतेनुसार भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील एकुण 1183 पदांच्या सुधारित आकृतीबंधास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे . या पदांचा पदनिहाय सविस्तर तपशिल सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

यांमध्ये गट ब संवर्गात सहाय्यक भूवैज्ञानिक , लेखाधिकारी , सहाय्यक रसायनी , कनिष्ठ भूवैज्ञानिक , सहाय्यक भूभौतिक तज्ञ , सहाय्यक अभियंता , सहाय्यक प्रशासन अधिकारी , या अशा एकुण 368 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . तर गट क संवर्गात कनिष्ठ भूभौतिक तज्ञ , कनिष्ठ रसायनी , तांत्रिक अधिकारी , प्रोग्रॅमर , भौगोलिक माहिती प्रणाली अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , कार्यालय अधिक्षक , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , लघुटंकलेखक , उप लेखापाल , कनिष्ठ अभियंता , दोर खंडवाला / रिंगमन अशा वर्ग क पदांमध्ये 653 पदभरतीस मंजुरी देण्यात आलेली आहे .

यांमध्ये वाहन चालक , चतुर्थ श्रेणी कर्मचारी ( बहुउद्देशिय कर्मचारी ) , हे पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .यांमध्ये वाहनचालक पदांच्या एकुण 122 जागा तर बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या एकुण 178 पदांवर बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास राज्य शासनांने मंजुरी दिलेली आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment