महाराष्ट्र राज्यात पोलिस दलामधील पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापना वरील पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून , सदर शासन निर्णयान्वये काही वाढीव पदे निर्माण करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य मुंबई या पोलिस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील घटकनिहाय एकुण नियमित 519 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकुण 40 सेवा अशा एकूण 559 पदांचा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहेत .सदर आकृतीबंधानुसार राज्यातील पोलिस दलामधील नियमित पदांची तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाची माहिती ( पदनाम , वेतन श्रेणी , मंजुर पदे ) सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
संवर्गनिहाय पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय यांमधील एकुण नियमित पदे त्यांची वेतनसंरचना व सुधारित आकृतीबंधानुसार मंजुर मदे यासंदर्भात संवर्गनिहाय पदनाम / पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
हे पण वाचा : Indian Navy : भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगचे करा आवेदन !
यांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा मध्ये दप्तरी , नाईक , कार्यालयीन शिपाई , पाणक्या अशा एकुण 40 पदे हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत . जे कि , नियमित वेतनश्रेणीमधून मृत संवर्ग घोषित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात निर्गमित सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .