राज्यातील नगरपरिषदा आस्थापनेवरील गट क व ड संवर्गातील 12,833 पदांसाठी मेगाभरती बाबत नविन जाहीरात प्रसिद्ध !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व नगरपरिषदा आस्थापेनवरील संवर्ग क व ड च्या स्थायी रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रिया संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनाल विभागाकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक सह आयुक्त / उपायुक्त ,नगरपरिषद प्रशासन शाखा तसेच विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक कार्यालय सर्व त्याचबरोबर जिल्हा सह आयुक्त सर्व , मुख्याधिकारी नगरपरिषदा / नगरपंचायती सर्व यांना सदर परिपत्रकान्वये सुचित करण्यात आलेले आहेत .

महाराष्ट्र राज्यांमध्ये एकुण 34 जिल्ह्यात 383 नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्गातील पदाव्यतिरिक्त आकृतीबंधानुसार नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेवर वरिष्ठ लिपिक , लिपिक टंकलेखक , लघूटंकलेखक , गाळणी चालक , प्रयोगशाहा सहाय्यक , उद्यान पर्यवेक्षक , सहाय्यक ग्रंथपाल , पंप ऑपरेटर , विजतंत्री , जोडारी , तारतंत्री , वायरमन , शिपाई ,मुकादम , सफाई कामगार , व या व्यतिरिक्त संचालक स्तरावरफन विविध पदे मंजूर करण्यात आलेली आहेत .त्यानुसार पदांची शैक्षणिक अर्हता , भरती पद्धतीचे प्रमाण विहीत करणेत आले आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

तसेच शासनांकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील रिक्त पदे भरणेबाबत , सामन्य प्रशासन विभाग , शासन निर्णय क्रमांक दि.04 मे 2022 नुसार भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब , गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेन भरणेबाबत , एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत .

त्या अनुषंगाने सरळसेवेने पदभरती प्रक्रियेची कार्यवाही दिनांक 31.10.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 15.08.2023 पर्यंत पुर्ण करावयाचे नमुद केले आहे . त्यास अनुसरुन संचालनाकडून राज्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गड ड च्या स्थायी रिक्त पदांबाबत , वारंवार सूचना देण्यात येवून आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment