महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा मध्ये लिपिक , चालक , प्रयोगशाळा सहाय्यक , वर्ग क मधील सर्व पदे , शिपाई ,फायरमन इ. पदांसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरी गट क व गट ड च्या संवर्गनिहाय पदांची किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आलेली असून , रिक्त पदांवर नगरपरिषद प्रशासन संचालनालय कडून मंजुर केलेल्या कोट्यानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच भरती प्रद्धत प्रमाण याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

वरीष्ठ लिपिक या पदांकरीता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर सदर पदांच्या 25 टक्के प्रमाणात सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . तर लिपिक टंकलेखक या पदांकरीता उमदेवार हा किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच शासन मान्य औद्योगिक संस्थेचे डेटा एन्ट्री ऑपरेटर उत्तीर्ण प्रमाणापत्र असणे आवश्यक आहे . तर सदर रिक्त पदांच्या 50 टक्के क्षमतेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस मंजुरी देण्यात आलेली आहे .

तर वाहनचालक व ड्रायव्हर कम ऑपरेटर पदांकरीता किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे . सदर रिक्त पदांच्या 100 टक्के क्षमतेने सरळसेवा पद्धतीने पदभरती करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण मध्ये पदभरती प्रक्रिया 2023

त्याचबरेाबर गाळणी चालक , प्रयोगशाळा सहाय्यक , पंप ऑपरेटर , जोडारी / वीजतंत्री , तारतंत्री / वारमन या पदांकरीता उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर सदर रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने सरळसेवा पद्धतीने पदभरती करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .

त्याचबरोबर उद्यान पर्यवेक्षक , सहाय्यक ग्रंथपाल , तसेच इतर वर्ग 3 मधील इतर सर्व पदे व्हॉलमन पदांकरीता 100 टक्के क्षमतेने पदभरती करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .तर शिपाई या पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 9 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर या रिक्त पदांवर 100 क्षमतेने पदभरती करण्यास मंजुरी देण्यात येत आहे . तर फायरमन या पदांकरीता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर सदर रिक्त पदांवर 100 % क्षमतेने पदभरती करण्यास राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात येत आहे .

या संदर्भातील नगरपरिषद प्रशासन संचालनाल विभागाकडून निर्गमित झालेला सविस्तर पदभरती प्रक्रिया परीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

पदभरती परिपत्रक

Leave a Comment