महाराष्ट्र राज्य शासन सेवेतमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग क संवर्गातील तब्बल 16,308 रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानुसार राज्य शासन सेवेतमध्ये एकुण 75 हजार पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यापैकी राज्य शासनाच्या जिल्हा परिषदेमध्ये , एकुण 16,308 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
यामध्ये शिक्षक , ग्रामसेवक , आरोग्य सेवक , कृषी सेवक , कृषी अधिकारी , विस्तार अधिकारी , लिपिक , डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी वर्ग क संवर्गातील पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .जिल्हा परिषदेकडून रिक्त पदांचा आढावा घेण्यात आलेला असून , रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने पदभरती करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर सरळसेवा पदभरती प्रक्रिया करीता उमेदवारांचे वयोमर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर पदभरती बाबतची जाहीरात मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित करण्यात येणार आहे .
यामध्ये ग्रामसेवक , शिक्षक , अधिकारी अशा पदनिहाय वेगवेगळी जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असून , परिक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे . नुकतेच राज्य शासनाने सरळसेवा वयोमर्यादा वाढविणे बाबतचा निर्णय घेतल्याने , सरळसेवा पदभरतीला वेग आला आहे .
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !