MSRTC : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहक – चालक व लिपिक पदांच्या तब्बल 28,317 पदांसाठी नविन महाभरती 2023

Spread the love

कोरोना काळांमध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपानंतर महामंडळामध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . कर्मचाऱ्यांचा हा संप तब्बल पाच महिने सुरुच होता , यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे , यामुळेच महामंडळाने वर्षभर नियमित पदांवर पदभरती न करता कंत्राटी पद्धतीनेच पदे भरले आहेत .

सध्या राज्य शासनाच्या नविन धोरणांनुसार बस महामंडळाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिेष्ट्ये आहे .या नविन धोरणांनुसार राज्याच्या लगतच्या राज्यांमध्ये महामंडळाकडून अधिक सुविधा देण्यात येणार आहेत . राज्याच्या लगतच्या राज्य सरकारची बसेसमध्ये अधिक चांगली सुविधा असल्याने महाराष्ट्रामधीलच नागरीक कर्नाटक , गुजरात , मध्य प्रदेश सरकारच्या सार्वजनिक बसेसचा वापर करतात . शिवाय राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये , कर्नाटक राज्याची बसेसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलेल्या आहेत .

शिवाय कर्नाटक सार्वजनिक बसेसची सुविधा चांगली आहे , व नियमित फेऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने , महाराष्ट्र राज्य परिवन महामंडळाला अधिक सुविधा देणे आवश्यक असल्याची बाब राज्य शासनाला निदर्शनास आलेली आहे .

याकरीता नविन पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यामध्ये वाहक – चालक व लिपिक पदांच्या तब्बल 28,317 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल .सदर महाभरती प्रक्रिया लवकरच राज्य शासनांकडून राबविण्यात येणार असून , राज्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .

पात्रता – वाहक व चालक पदांकरीता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराला मराठी बोलता / वाचता येणे आवश्यक आहे .तसेच उमेदवारांकडून अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे ,तर वाहक पदांकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वैध परवाना व बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे .

त्याचबरोबर उमेदवाराची किमान उंची 160 से.मी असणे आवश्यक आहे तर कमाल उंची 180 से.मी . उमेदवाराची दृष्टी चष्माविना 6 X 6 ( चष्माविरहित दृष्टी ) असणे आवश्यक आहे . रंगआंधळेपणा हा दोष असल्यास उमेदवार अपात्र ठरेल .

लिपिक पदाकरिता उमेदवार हा पदवीधारक असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवार हा मराठी 30 श. प्र.मि व इंग्रजी 40 श. प्र.मी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

Leave a Comment