महावितरण कंपनीमध्ये 5,347 जागेसाठी मेगाभरती 2024 , अर्ज करण्यास मुदतवाढ !

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 5,347 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5,347 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित करण्यात आलेली 02 वर्षांची वीजतंत्री / तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : केन्द्र शासन सेवेत गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/  या संकेतस्थळावर दि .20 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 250/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ /अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment