महावितरण मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा वर्ग 3) पदांच्या तब्बल 468 जागांसाठी महाभरती , लगचे करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ मध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या तब्बल 468 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Recruitment For Junior Assistant ( Account ) Post , Number of Post Vacancy – 468 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात …

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : महावितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या एकुण 468 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी.एम.एस / बी.बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत  . व उमेदवार हे MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महावितरण कंपनीमध्ये 5,347 जागेसाठी मेगाभरती 2024 , अर्ज करण्यास मुदतवाढ !

वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29.12.2023 रोजी पर्यंत कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षांपर्यंत तर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/  या संकेतस्थळावर दिनांक 20 मे 2024 पर्यंत आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रिय करीता खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास/ अनाथ प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

मुदतवाढ शुद्धीपत्रक

Leave a Comment