NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 150 जागेसाठी महाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

Spread the love

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये तब्बल 150 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Bank For Agriculture And Rural Development Recruitment For Assistant Manager ( Grade A ) , Number of Post Vacancy – 150 ) पदनाम , पदांची संख्या , शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A ( RDBS ) पदांच्या एकुण 150 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदवी यांमध्ये MBA /BBA/BMS/M.TECH/MSC/CA/B.TECH किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . ( मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता गुणांमध्ये 5 टक्क्यांची सुट देण्यात येईल . )

हे पण वाचा : PGCIL : पॉवर ग्रिड महामंडळ , इंडिया मध्ये 425 जागांसाठी आत्ताची मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 23 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 800/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता 150/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment