( ONGC ) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 2500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oil and Natural Gas Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 2500 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या एकुण 2500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , देशातील विभागनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | विभागाचे नाव | पदांची संख्या |
| 01. | उत्तर विभाग | 159 |
| 02. | मुंबई विभाग | 436 |
| 03. | पश्चिम विभाग | 732 |
| 04. | मध्य विभाग | 202 |
| 05. | दक्षिण विभाग | 378 |
| 06. | पुर्व विभाग | 593 |
| एकूण पदांची संख्या | 2500 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदांकरीता उमदेवार हे B.COM /B.A/B.TECH/B.E/B.B.A अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
ट्रेड अप्रेंटिस : ट्रेड अप्रेंटिस या पदाकरीता उमेदवार हे 10 वी /12 वी / आयटीआय ( संबंधित ट्रेड मध्ये ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
टेक्निशियन ( तांत्रिक ) अप्रेंटिस : तांत्रिक अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे संगणक / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : वरील पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्कय असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ या संकेतस्थळावर दिनांक 20 सप्टैंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत तब्बल 152 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- आधार ऑपरेटर / सुपरवायझर पदांसाठी महाभरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- DMER : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 1540 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- भारतीय वायुदल अंतर्गत जनरल ड्युटी , तांत्रिक , लिपिक , भांडारपाल , ट्रेड्समन इ. पदांसाठी महाभरती !
- ECHS : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026