भारतातील शेती सध्या विस्तारलेली असून त्या शेतीमध्ये आता आधुनिकतेची भर पडली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन शेतकरी आता गुणवत्तापूर्ण वानांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन काढणे सोपे जात आहे. शेतकऱ्यांचा आता भाजीपाला व फळ पिकांकडे कल जास्तच वाढत चालला आहे.
खासकरून शेतकरी आता शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून फळ लागवड करण्याचा विचार करत आहेत. शासन सुद्धा शेतकऱ्यांना फळ लागवडीसाठी वेगवेगळ्या शासकीय योजना राबवत आहे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.
अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये शासन मदत करते जेणेकरून शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून त्याचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल. फळबाग लागवडीसाठी आतापर्यंत शासनाने अनेक उपाययोजना राबवले आहेत. त्यामधील महत्त्वाची योजना जी सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवत आहे ती म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत ही एक महत्त्वाची राबवली जाणारी योजना असून राज्य शासनातर्फे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधू भगिनींना अनुदान दिले जाते.
नेमकी काय आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना?
शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल खोल माहिती बघायची झाली तर शासनाने राबवलेली ही योजना सन 2018-19 ह्या वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेच्या माध्यमातून जे कोणी लाभार्थी शेतकरी असतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येईल. शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून अनेक शेती विषयक योजनाना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठीच या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून अनुदान सुद्धा देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत किती मिळतो अनुदानाचा लाभ?
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे त्या शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या अनुदानापैकी पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होते. या सोबतच दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाते.
परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाने एक महत्त्वाचा नियम काढला आहे. तो नियम म्हणजे जे शेतकरी या पिकाचे लागवड करतील अशावेळी बागायती ठिकाणी एकूण झाडांपैकी 90 टक्के झाडे जिवंत असणे गरजेचे आहे व कोरडवाहू ठिकाणी एकूण लागवड केलेल्या झाडांपैकी 80 टक्के झाडे जिवंत असणे गरजेचे आहे तरच आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
जर हे प्रमाण कमी झाले असल्यास शेतकऱ्यांनी नवीन रोपे आणून त्या ठिकाणी लावावीत व शासनाच्या नियमानुसार प्रमाण समतोल ठेवावे असे केल्या सरकार शेतकऱ्यांना नक्कीच अनुदान देईल.
योजनेत सहभागी घेण्यासाठी पात्रता / अटी शर्ती
शेतकरी बंधू भगिनींनो या योजनेमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुमच्या पात्रतेसाठी तुम्ही जर कोकण विभागातील शेतकरी असाल तर तुमच्या नावावर कमीत कमी दहा गुंठे आणि जास्तीत जास्त दहा हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. या सोबतच इतर ठिकाणी तुम्ही शेती करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या नावावरती कमीत कमी 20 गुंठे आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर क्षेत्र असणे गरजेचे आहे. तरच शासनाने राबवलेल्या या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ मिळू शकेल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अल्प भूधारक शेतकरी व अत्यल्प भूधारक शेतकरी यासोबतच महिला दिव्यांग शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच शेतकरी बंधूंनी आपल्या स्वतःचा सातबारा उताऱ्यावर फळबाग लागवड ची नोंद करून घ्यावी.
शेतकरी बंधू भगिनींनो एक महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल. तर शेतामध्ये ठिबक सिंचन चा वापर करूनच फळबाग लागवड करणे गरजेचे असणार आहे. तरच शासन तुम्हाला अनुदान देईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी कालावधी हा 30 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे संपूर्ण साधन हे शेती वरती आधारित आहे असे ग्राह्य धरून या योजनेचा लाभ वयक्तिक शेतकऱ्याला देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी .ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे सातबारा व आठ अ खाते उतारा, यासोबतच हमीपत्र, संयुक्त खातेदार असाल तर सर्व खातेदारांचे संमती पत्र महत्वाचे आहे, जातीचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असेल.
या योजनेचे आणखी फायदे
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या उभारणी करिता राज्य शासनाकडून 100% अनुदान देण्यात येणार आहे.
- राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !
- विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- नाशिक येथे शिक्षण संस्थेवर पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती !