रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शासन देत आहे 90% शासकीय अनुदान ! या योजनेच्या माध्यमातून आजच करा अर्ज .

Spread the love

शेती करत असताना शेतकरी नेहमीच वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असतो. सध्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेली आहे. अनियमित नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक नष्ट होऊ लागले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना जास्त कष्ट करून सुद्धा पाहिजेल असं नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकून आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे किंवा शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. यासाठी शासन सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. यासोबतच कर्ज व अनुदान सुद्धा उपलब्ध करून देत आहे.

शेतीपूरक व्यवसाय मध्ये रेशीम उद्योग हा एक महत्वपूर्ण व्यवसाय असून हा व्यवसाय करण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपायोजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपण कमी भांडवलामध्ये आपला रेशीम उद्योग सुरू करून चांगलाच नफा मिळवू शकतो. आज आपण शासनाने राबवलेल्या या योजनांविषयी माहिती घेणार आहोत, पण सर्वात आधी जाणून घेऊया रेशीम उद्योग का करावा.

शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग का करावा?

अ. रेशीम उद्योग केल्याने शेतकऱ्यांना दरमहा शाश्वत उत्पादन मिळते.

ब. एकदा लागवड केली की बारा ते पंधरा वर्ष अजिबात लागवड करायची गरज नाही. यासोबतच एकदा शेड बांधले की परत कोणतेही साहित्य विकत घ्यायची गरज नाही आपले भांडवल आहे असे उभे राहते.

क. इतर बागायती पिकांच्या तुलनेत पाण्याचा कमी वापर करावा लागतो.

ड. रेशीम अळ्यांचे संगोपन करण्यासाठी आपण पाला वापरत असतो. त्या पाल्यावर कोणत्याही रासायनिक कीटक किंवा बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत नाही.

इ. अळ्यांनी खाऊन जो शिल्लक पाला राहिलेला असतो तो जनावरांना टाकला की जनावरांचे दूध व फॅट वाढते.

ई. अळ्यांचे संगोपन करत असताना राहिलेला कचरा, काड्या, अळीची विस्टा, या सोबतच आळ्या खाऊन राहिलेला पाला कुजून त्याचे खत तयार होते. त्या खतांमध्ये गांडूळ सोडल्यास उत्तम दर्जाचे गांडूळ खत निर्माण होते.

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकता,

तर मित्रांनो, आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो मुद्दा म्हणजे हा व्यवसाय करण्यासाठी शासन आपल्याला अनुदान देत आहे. हे अनुदान आपल्याला कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून भेटत आहे तर त्यापैकी पहिले योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यासोबतच शासनाने राबवलेली दुसरी योजना आहे केंद्र पुरस्कृत योजना – सिल्क समग्र (ISDSI). शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून आपण नक्कीच योग्य ते अनुदान मिळवून रेशीम उद्योग सुरू करू शकतो आणि त्यातून चांगला नफा मिळवू शकतो.

या योजनेच्या माध्यमातून आपल्याला किती अनुदान मिळते चला जाणून घेऊ

अ. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक एकरा साठी तुती लागवड जोपासना यासोबतच विविध साहित्याची खरेदी यासाठी शासन एकूण २००१७६/- इतके अनुदान तीन वर्षांमध्ये विभागून देत आहे. यासोबतच कीटकांचे संगोपन गृह बांधण्यासाठी सुरुवातीलाच एका वर्षांमध्ये ९२२८९/- इतके इतके अनुदान देत आहे. सर्वात प्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक राहील.

ब. केंद्र पुरस्कृत योजना – सिल्क समग्र (ISDSI) – मनरेगा योजनेच्या अटी व शर्तीमध्ये न बसणाऱ्या लाभार्थीसाठी ही योजना लागू असणार आहे .

यासोबतच केंद्र पुरस्कृत योजना – सिल्क समग्र (ISDSI) ही योजना शासनाने त्यांनागरिकांसाठी राबवली आहे जे नागरिक महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अटीवर शर्तीमध्ये बसत नाहीत.

रेशीम उद्योगासाठी शासन एवढे रुपये विभागून देत आहे

१. विकास योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी 50 हजार रुपये,

२. संगोपन ग्रह उभा करण्यासाठी एक लाख 68 हजार रुपये,

३. कीटक संगोपन व साहित्यांचे पुरवठा करण्यासाठी 75 हजार रुपये,

४. ठिबक सिंचनासाठी 50 हजार रुपये,

सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांना वरील अनुदान माप दंडाच्या 75 टक्के तीन वर्षांमध्ये मिळते यासोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातील व अनुसूचित जमाती परवर्गातील लाभार्थ्यांसाठी वरील मापदंडाच्या 90 टक्के अनुदान तीन वर्षांमध्ये दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा

१) सर्व प्रथम रेशीम शासनाची www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती साईन अप मध्ये New user वरती क्लिक करून घ्या I Agree करून घ्या. हे केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar ऑपशन वर क्लीक करावे.

२) त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेली सर्व माहिती भरून सर्वात शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो ह्यासोबतच आधार कार्ड आणि बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करायची आहे.

३) नंतर शेवटी Submit केले की शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाला असे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल.

४) ऑनलाईन नोंदणी झाली की संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन ७/१२ आणि ८ अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि जॉब कार्ड इ. घेऊन नोंदणीची जी काही शुल्क असेल ती शुल्कासह देऊन नोंदणीचे काम पूर्ण करावे.

५) शासनाच्या वेबसाईट वरती जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

www.mahasilk.maharashtra.gov.in

Leave a Comment