राज्य कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट ! कर्मचाऱ्यांच्या पगारात  होणार मोठी वाढ ! अधिवेशनांतुन आत्ताची मोठी अपडेट .

Spread the love

सध्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असून , या अधिवेशनांमध्ये विविध प्रश्नांवर निर्णय लागत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच अधिवेशनांमध्ये राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली असून , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे तुर्तास उचित नाही . असे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे .

परंतु राज्यातील महिला व बाल विकास विभागांर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहेत . अंगणवाडी कर्मचारी ह्या राज्य शासनाचे अर्धवेळ कर्मचारी म्हणून शासन सेवेमध्ये कार्यरत आहेत . अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडुन वारंवार अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडुन पगारामध्ये वाढ करणेबाबत , वारंवार राज्य शासनास निवेदने देवूनही सरकारकडुन अद्याप कोणताही निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला नव्हता .

परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिवसेंदिवस वाढती व्याप्ती त्याचबरोबर अतिरिक्त काम यामुळे अर्धवेळ असणारे अंगणवाडी कर्मचारी यांना पुर्ण वेळ काम करण्याची वेळ आली असल्याने , पगारांमध्ये वाढ करणे अत्यावश्यक बाब असल्याची सरकारकडुन सुनिश्चित करण्यात आले आहे .

या संदर्भात राज्य शासनाचे महिला व बाल विकास मंत्र्यांकडुन सकारात्मक भुमिका आज अधिवेशनांमध्ये मांडण्यात आली असल्याने , अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये चक्क दुप्पट वाढ होणार होऊ शकतो .सदरचा प्रश्न अधिवेशनांमध्ये मांडल्याने या संदर्भात योग्य तो उचित शासन निर्णय संबंधित विभागांकडुन निर्गमित करण्यात येणार आहे .

कर्मचारी विषयक ( Employee Related ) , भरती / सरकारी योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Join करा Whatsapp ग्रुप

Leave a Comment