राज्यातील शासकीय / निमशासकीय व इतर पात्र तसेच निवृत्तीवेतन / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे केंद्राच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ लागु होणार आहे .राज्य कर्मचारी अनेक दिवसांपासुन डी.ए वाढीच्या प्रतिक्षेत आहेत , अखेर राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे .
हिवाळी अधिवेशनांमध्ये मोठा निर्णय –
सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असुन या अधिवेशनांमध्ये राज्य कर्मचारी हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत . यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 4 टक्के डी.ए वाढ त्वरीत लागु करण्यात येणार आहे . शिवाय सदर डी.ए वाढ ही माहे जुलै 2022 पासुन असल्याने जुलै नोव्हेंबर या कालावधीमधील डी.ए थकबाकी अदा करण्यासाठी आवश्यक निधीची तरतुद अधिवेशनांमध्ये करण्यात येणार आहे .
डी.ए वाढीसह कर्मचाऱ्यांच्या विवध प्रश्नांवर अधिवेशनांमध्ये तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे .यामध्ये प्रामुख्याने सध्या अधिकच चर्चेत असणारा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात मोठा निर्णय अधिवेशनांमध्ये होऊ शकतो .
राज्य शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास , राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 38 टक्के होणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगार / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .चार टक्के डी.ए वाढीमुळे वेतनांमध्ये किमान 600/- रुपये ते 15,000/- रुपयांची वाढ होणार आहे .
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..