राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! डी.ए थकबाकीही देण्याचे आदेश ! GR दि.23.11.2022

Spread the love

राज्य शासन सेवेतीत 5 वा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीमध्ये पेन्शन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018 ते दि.01 .01.2022 या कालावधीमधील डी.ए वाढ लागु करण्यात आलेली असून या संदर्भात वित्त विभागाकडुन आज दि.23.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दि.23.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये असे आदेश देण्यात आले आहेत कि , जे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक कर्मचारी अजुनही असुधारित वेतनश्रेणीमध्ये पेन्शन धारण करीत आहेत . त्यांना त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या रकमेवर अनुज्ञेय महागाई वाढीचा दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे . दि.01 जुलै 2018 पासुन ते दि.01 जानेवारी 2022 पर्यंत महागाई भत्ता वाढीचा दर पुढील तक्त्यानुसार पाहु शकता .

वरील नमुद महागाई भत्ता वाढीनुसार अनुज्ञेय असणाऱ्या थकबाकी माहे नोव्हेंबर 2022 च्या निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे .महागाई भत्ता वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी यांची असणार आहे .या संदर्भातील डी.ए सुधारणा बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment