राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ बाबतचा अखेर शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्यातील अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्य मानधनात वाढ करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातुन एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध हेाऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येवून त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते .उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वांवर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहेत . यामध्ये सध्याच्या घडीला राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयासाठी शिक्षकांच्या मानधनांमध्ये सुधारणा करुन 150/- रुपये प्रति तास करण्यात करण्यात आले आहेत . तर माध्यमिक शिक्षकांकरीता 120/- प्रति तास अशी सुधारणा करण्यात आलेली आहे . यासाठी घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असणे आवश्यक आहे .या निर्णयामुळे राज्यातील घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे .

या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.21.11.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय संकेतांक क्रमांक – 202211211516495221 ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , सरकारी योजना / पदभरती व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी पुढील लिंकवर क्लिक करा .


Leave a Comment